Posts

Showing posts from June, 2025

प्रिन्स इंग्लिश स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भव्य योग शिबिराचे आयोजन.

Image
प्रिन्स इंग्लिश स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भव्य योग शिबिराचे आयोजन.  सेलू, जि. परभणी, दि. २० जून २०२५, सकाळी ८:०० वा. : श्रीराम प्रतिष्ठान सेलू आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एक भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर उद्या, शनिवार, २१ जून २०२५ रोजी सकाळी ८.०० वाजता प्रिन्स इंग्लिश स्कूल, सेलू येथे आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिरामार्फत योगाच्या माध्यमातून आरोग्य जागृती आणि जीवनशैली सुधारणेकडे लक्ष वेधले जाणार असून, स्थानिक नागरिकांसह युवक आणि वृद्धांसाठीही हे शिबिर उपयुक्त ठरणार आहे. या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा संदेश या प्रसंगी वाचला जाणार आहे. पंतप्रधानांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही योग दिनाचे महत्त्व अधोरेखित करणारा संदेश दिला असून, तो या शिबिरात जनतेपर्यंत पोहोचवला जाणार आहे. तसेच, शिबिराला राज्यमंत्री, महाराष्ट्र शासन सौ. मेघनादीदी बोर्डीकर साकोरे आणि भाजपा नेते, परभणी मा. श्री. रामप्रसादजी बोर्डीकर साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या मान्यवरांच्या...